Ad will apear here
Next
उन्हाच्या कडाक्यात पिके वाचवण्यासाठी सोलापुरातील शेतकऱ्यांची धडपड


सोलापूर :
कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. सध्या उष्णतेची लाट आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करून धडपडत आहेत.



सोलापूर जिल्ह्यात सध्या सरासरी ४३ अंश सेल्सिअसच्या वर तापमान आहे. या वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी जास्त खर्च करावा लागत आहे. पिकांना दिलेल्या पाण्याचे कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी बहुतांश शेतकरी आपल्या बागांमध्ये जैविक, तसेच प्लास्टिक आच्छादन करू लागले आहेत. केवड (ता. माढा) येथील शेतकरी महारुद्र लटके यांच्याशी संपर्क साधला असता, कडक उन्हापासून फळबागा वाचवण्यासाठी जैविक आच्छादनावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 



जिल्ह्यातील काही शेतकरी कडक उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फळे पाॅलीप्राॅपिलीनने झाकून घेत आहेत. काही भागात बागेतील झाडांच्या खोडांना गेरू पेस्ट लावली जात आहे. शेतकरी पिकांना रात्रीच्या वेळीच पाणी देण्याचे नियोजन करत आहेत. 



फळकाढणी झालेल्या बागांमध्ये हलकी छाटणी केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात स्लरीचा वापर वाढवला आहे. एकूणच हातातोंडाशी आलली पिके उष्णतेमुळे वाया जाऊ नयेत, म्हणून शेतकरी धडपड करताना दिसत आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZHUBZ
Similar Posts
‘या’ शेतकऱ्याने केलीय ‘प्रतिकॉफी’ची लागवड सोलापूर : जुन्या काळातील लोक अनेक वनस्पतींचा उपयोग आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी करत होते. काही ठिकाणी पेरूच्या पानांचा उपयोग चहासाठी केला जाया. त्याचप्रमाणे एका वनस्पतीच्या बियांचा उपयोग कॉफीच्या चवीचे पेय तयार करण्यासाठी केला जायचा. अलीकडच्या काळात ही वनस्पती फारशी आढळत नाही. म्हणूनच या वनस्पतीचे जतन करण्याच्या हेतूने विठ्ठलवाडी (ता
रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातर्फे कारखान्याच्या सभासदांना अल्प दरात साखरेचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सणासुदीच्या दिवसांत घरपोच साखर मिळाल्याने सभासदांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
‘आई... बाबा... मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’ सोलापूर : ‘आई... बाबा... तुम्ही मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा...!’ असा संदेश सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या पालकांना पत्राद्वारे देणार आहेत. सोलापूर व माढा या लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे.
गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी राधेश बादले-पाटील सोलापूर : मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून पंढरपूरचे राधेश बादले-पाटील यांची निवड झाली. मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे २३ जून २०१९ रोजी ही निवड जाहीर केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language